लोहगाव – बिडकीन रोडवरील तोंडोळी गावाजवळ कारवाई
बिडकीन, (प्रतिनिधी) : राज्यात विक्री, साठा आणि वाहतुकीस प्रतिबंध असलेल्या पान मसाला व सुगंधित तंबाखूची अवैध वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध बिडकीन पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.
लोहगाव-बिडकीन रोडवरील तोंडोळी गावाजवळ सापळा रचून बुधवारी (दि.२५) पोलिसांनी कारमधून वाहतूक केला जात असलेला प्रतिबंधित पान मसाला व सुगंधित तंबाखूचा साठा जप्त केला. या कारवाईत दोघांना अटक करण्यात आली
असून, वाहनासह एकूण ११ लाख ५२ हजार ७६४ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. बुधवारी दुपारी १ वाजून २० मिनिटांनी तोडोली गावाजवळ पोलिसांनी सापळा स्वला. यावेळी पांढऱ्या रंगाची विनाक्रमांकाची किया सेन्टॉस कार योताना दिसताच पोलिसांनी वाहन थांबवून तपासणी केली.
वाहनात सुनिल जयराम बोलो (क्य ३३. रा. टेंभापुरी, ता. नांगापूर) आणि आली अहेमद पटेल (वय ३०, रा. शिकताना, ता. गंगापूर) हे दोघे आढळून आले. वाहनाची झडती घेतली असता त्यामध्ये प्रतिबंधित पान मसाला आणि सुचितंबाखू जसा विविध कंपन्यांचा प्रतिबंधित माल जाकडून आला. पोलिसांनी हा संपूर्ण साठा तसेच वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली अंदाजे २ लाख ५० हजार रुपये किमतीची कार जप्त केली.
या प्रकरणी अन्न व औषध प्रशासनाचे अन्न सुरक्षा अधिकारी प्रशांत सुरेश अजिंक्यकर यांच्या फिर्यादीवरून बिडकीन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक राजू तडवी, पोलिस उपनिरीक्षक संभाजी झिंगुडे, पोलिस हेडकॉन्स्टेबल वागद शेख, नाडे, वाल्मीक निकम, पोलिस कॉन्स्टेबल योगेश वाघमारे आणि स्वप्नील दिलवाले यांनी केली.
दरम्यान, जप्त करण्यात आलेल्या प्रतिबंधित अन्नपदायचि नमुने अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी विश्लेषणासाठी घेतले आहेत. या मालाचा पुरवठादार, विक्रेते आणि उत्पादक यांचा शोध घेण्यासाठी पुढील तपास सुरू असून, अटक करण्यात आलेल्या आरोपींचा पूर्वीचा गुन्हेगारी इतिहासही तपासला जात आहे.














